रायगड – यावर्षी युरोपियन युनियनला आंबा निर्यात होणार की नाही हे प्रश्नचिन्ह कायम असले तरी वाशी-नवी मुंबई येथे आंब्यासाठी सुरु झालेल्या रेडिएशन केंद्रामुळे हापूस आंब्याच्या अमेरिका वारीतील सारे अडथळे दुर झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन पणन मंडळाचे सदस्य सचिव मिलिंद आकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार वाशी-नवी मुंबई येथील अमेरिकेच्या अन्न औषध प्रशासनाला या केंद्राबद्दल कळवण्यात आले आहे. अमेरिकेचे प्रतिनिधी लवकरच भारतात येतील अशी अपेक्षा आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवडयात त्यांच्या उपस्थितीत आंब्यावर रेडिएशन प्रक्रिया करण्यात येईल आणि आंबा निर्यातीचा मार्ग खुला होईल. यापूर्वी लासल गाव येथे आंबा नेवून तेथे रेडिएशन प्रक्रिया करण्याची गरज होती आता वाशी-नवी मुंबई येथे ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

Post a Comment