प्रथमच रुपेरी पडद्यावर आगामी ‘फितूर’ या चित्रपटामध्ये झळकणारी जोडी आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ आता छोटा पडद्यावरही सोबत दिसणार असून ही जोडी ‘स्लाईस’ मँगो पेयाची जाहीरातीत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या जाहिरातीत कतरिनाचे मँगोप्रेम आपल्याला पून्हा पाहायला मिळणार आहे. यात आदित्यही तिला साथ देणार आहे. आदित्य आणि कतरिना सध्या ‘फितूर’ चित्रपटाची शुटींग करत आहेत.
या जाहीरातीचे चित्रीकरण करतांना विशेष मजा आली कारण आदित्य आणि मी एकाच चित्रपटात कामही करत आहोत आणि त्यादरम्यान आमची खूप चांगली मैत्री जुळून आली आहे, असे कतरिना सांगते. ही जाहिरात १ एप्रिल पासून पाहता येणार आहे. तसेच अभिषेक कपूरने दिग्दर्शित केलेला फितूर चित्रपट फेब्रूवारी २०१६ मध्ये झळकणार आहे

Post a Comment