0
शाहिद कपुर लवकरच दिल्लीस्थित मीरा राजपुतशी विवाह करणार आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे . पण ऐकुन आश्चर्य वाटेल कि शाहिदची पुर्वाश्रमीची प्रेयसी आणि सैफ अली खानची पत्नी करिना कपुर या बातमीने अत्यंत खुश आहे. ही बातमी आल्यानंतर करिनाशी संपर्क केला असता तिने यावर अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि शाहिदला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. शाहिदने जानेवारीमध्ये मकर संक्रांतीलाच मीराशी साखरपुडा केला आहे. विशेष बाब म्हणजे या साखरपुड्याविषयी करिनाला अगोदरच माहिती होती. शाहिद आणि करिना सध्या अभिषेक चोबे यांच्या ‘उडता पंजाब’ ची शुटींग करत आहेत.

Post a Comment

 
Top